कॅमे-यातून .....
Sunday, May 12, 2013
पक्षांची समुद्र सफर....सीगल्स पक्षी
सीगल्स हे कबुतराच्या जातीचे पक्षी, बहुतांशी ते समुद्र किनारी आढळतात.
आक्रमक असलेले सीगल्स आपल्या हद्दीत आलेल्या अनोळखी पक्ष्यांना
एकत्रित हल्ला करून हुसकावून लावतात. असा हा कृष्ण धवल तरीही
दिसायला देखणा सीगल छायाचित्रकारांना नेहेमीच आकर्षित करणारा
पक्षी आहे.सीगल्स ऊर्फ कुरव असे त्यांचे नाव! हिवाळय़ाची चाहूल लागली,
की या किनाऱ्यावर हे सीगल्स पक्षी हजारोंच्या संख्येने येतात.
चाणाक्ष मासेमार असलेले हे पक्षी पाण्यावर थोडा वेळ चक्क तरंगू शकतात ...!!
घोळक्याने राहणारे हे पक्षी काबुताराप्रमाणेच बऱ्यापैकी माणसाळतात.
अलिबागला लाँचने प्रवास करताना हे पक्षी कायम साथ देत असतात.
काही मिळतो का? या प्रतिक्षेत हा त्यांचा प्रवास सुरु असतो.यांचे
फोटो काढणे अवघड आहे.
Labels:
पक्षी
Monday, May 6, 2013
Wednesday, May 1, 2013
शिवाजी महाराजांचे जन्मस्थान
शिवनेरी... शिवाजी महाराजांचे जन्मस्थान
.शिवनेरीला महाराष्ट्राच्या इतिहासात आगळे स्थान असून याच किल्ल्यात शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
ज्या किल्ल्याने महाराजांचे इवलंस रूप पाहिलं, ज्याची पावन भूमी महाराजांच्या चरणस्पर्शाने सुखाऊन गेली असा हा शिवनेरी ...
१९ फेब्रुवारी १६३० फाल्गुन वद्य ३ शके १५५२ या दिवशी शिवरायांचा येथे जन्म झाला
!! शिवाजी महाराज की जय !!
]
Sunday, April 21, 2013
चैत्रपालवी, पालवी बहरावी ती चैत्रासारखीच...
चैत्र महिना आणि वसंत ऋुतू यांचं नातंचं इतकं घट्ट आहे की
चैत्रातली पालवी म्हणावी की वसंताचा बहर म्हणावं असा प्रश्न पडतो.
प्रत्येक झाडाला नवी पालवी येते.त्याचा वास देहाला मोहर आणणारा असतो.
शिशिर ऋतूला निरोप देऊन चैत्र ऋतूराज वसंताला घेऊन येतो.चैत्रात साऱ्या सृष्टीला
नवचैतन्य प्राप्त होते.वृक्षांना पालवी फुटते.हिरव्या रंगातही विविध छटा दिसतात.काही
वृक्षांवर सुंदर फुले येतात तर काही फळांनी संपन्न होतात.
Labels:
चैत्र पालवी
Monday, April 15, 2013
Thursday, April 11, 2013
शोभायात्रा- ठाणे (२०१३)
!! गुडीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेछ्या !!
हे येणारे नविन वर्षे तुम्हा सर्वांना सुखाचे,
समृद्धीचे व भरभराटीचे जावो हिच देवाचरणी प्रार्थना!
गुढीपाडवा म्हणजेच ’चैत्र शुध्द प्रतिपदा’ ज्या दिवशी महाराष्ट्राचा सातवाहन
राजा गौतमीपुत्र ’सातकर्णी’ ने क्षत्रप राजा ’नहपान’ याचे हनन (वध) केले होते.
हा दिवस खुप मोठ्या विजयाचा होता. तेंव्हापासून ह्या विजयाच्या साक्षीने महाराष्ट्रीय
मराठी कालगणना सुरु केली गेली आणि हा दिवस गुढीपाडवा म्हणुन साजरा करण्यास
सुरुवात झाली. या दिवसाचे स्वागत महाराष्ट्रभर गुढ्या उभारुन केले जाते.
Labels:
शोभायात्रा
Tuesday, April 9, 2013
रमणीय देखावे
इथला निसर्ग... डोंगर, नद्या, शेतं, निळशार आकाश,
पान-फुलं रस्ते सगळे निर्सगाचे सोबती.
निसर्ग हा बोलत नाही. पण आपल्याला त्याच्याशी बोलल्यासारखं वाटतं.
परंतु न बोलता सर्व काही देणार असा माझा एक मित्र
भ्रमंती करताना जे काय चांगले दिसले ते टिपले आहे.
दुबई
अवचितगड
रतनगड
रोहिडा
हेमलकसा
सागरगड
राजमाची
Subscribe to:
Posts (Atom)












































