Sunday, May 15, 2011

छत्रपती शिवाजी टर्मिनस

      व्हिक्टोरिया टर्मिनस अर्थात व्हीटीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं आहे तेव्हापासून मुबंईतल्या     ह्या   रेल्वेस्टेशनला छत्रपती शिवाजी   टर्मिनस  (सीएसटी)  नावांने संबोधले जाउ लागले.
            दहशतवादी ह्ल्ल्यानतंर तर हे स्टेशन जगाच्या ओळखीचे झाले.अतिरेक्याँनी ह्ल्ल्यासाठी हे स्टेशन का
निवडले असेल? मुबंईच्या रोजच्या व्यवहारात ह्या स्टेशनाला खुप महत्व आहे.हे स्टेशन बंद झाले म्हणजे मुबंई बंद झालीच समजा.लगेच सगळे व्यवहार ठप्प होतात.  राजकारणी मुबंईचा बंदची घोषणा केल्यावर ते यशस्वी करण्यासाठी स्टेशन बंद करण्याच्या प्रयत्नात असतात. ह्या स्टेशनातून देशाच्या कानाकोप-यात गाड्या सुटतात  व येथे येतात.   मुबंईतून   कसारा,  कर्जत   व पनवेल   पर्यत लोकल गाड्या   दिवस रात्र पळत असतात. लाखो प्रवाशी रोज या स्टेशनाचा वापर करतात. देशातले सर्वात गर्दीचे हे स्टेशन असेल.पण येथे सर्व शिस्तीत सुरु असते.स्टेशन नेहमीच घावत असते.थाबंते तेव्हा ते बंद असते.हे एक प्रेक्षणिय स्थळ आहे.परदेशी पाहुणे नेहमीच या स्टेशनात फोटो काढताना दिसतात.





































































4 comments:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

फोटो सुरेख आहेत. आपण छत्रपति शिवाजी असे का म्हणतो, नुसते शिवाजी स्टेशन असे का म्हणत नाही? ’महाराणी व्हिक्टोरिया टर्मिनस’ असे कोणी म्हणत नसे. नशीब आपण ’गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपति श्री. शिवाजी महाराज स्टेशन’ असे म्हनत नाही!

mynac said...

विवेक फोटो छान आले आहेत.,
आत्ताचे सी.एस.टि.म्हणजेच पूर्वीचे व्ही.टि.स्टेशन हे साधारण १८८५-९० ह्या काळात बांधून पूर्ण झाले.१९८५ ते ९० च्या काळात ह्या स्टेशनला ( स्टेशनच्या इमारतीला) १०० वर्षे पूर्ण झाल्या बद्दल मुंबई दूरदर्शन वर त्या वेळचे स्टेशन मेंटेनन्स सिव्हील इन चार्ज ह्यांची एक मुलाखत बघितल्याचे स्मरते.त्या वेळची इंग्रजांची दूरदृष्टी बघता आज सव्वाशेहून अधिक वर्षानंतर सुद्धा ह्याचे राहून राहून आश्चर्य नि कौतुक वाटते कि पुढच्या १०० वर्षांचा विचार करून ...त्या वेळी इंग्रजांनी देशात भले त्या वेळी त्यांच्या फायद्या साठी का होईना पण जी कामे करून ठेवली आहेत त्याला तोड नाही.सदरहू मुलाखतीत त्या स्थापत्य प्रमुखांना एक प्रश्न विचारला होता कि आजच्या काळात (म्हणजे आज पासून २०-२५ वर्षापूर्वी) ह्या बिल्डींगच्या तोडीची बिल्डींग आपल्याला बांधायची असेल तर काय खर्च येईल किंवा करावे लागेल ? त्या वरील त्या प्रमुखांचे उत्तर ऐकण्या सारखे होते..ते म्हणाले होते कि " आजच्या काळात अशी बिल्डींग बांधायची तर दूर राहून द्यात पण अहो आम्हाला धड तिचा मेंटेनन्स सुद्धा सांभाळता येत नाही,अन तुम्ही काय विचारताय?" हि बिल्डींग बांधावयाच्या वेळी वीज अजून आलेली नव्हती त्या मुळे आत्ताच्या मेट्रो सिनेमा पर्यंत मातीचा रँप (भराव)तयार केला गेला होता,सदरहू ईमारत बांधते वेळी तेथ पासून ते मोठ मोठाले दगड त्या भरावावरून मजुरा करवी ढकलत आणून हि उंच ईमारत उभी करण्यात आली होती नि जस जसे बांधकाम पूर्ण होत जाईल तसं तसे ते बुजवून टाकावे लागत असे केल्यानेच कोणतीही प्रचलित काळातील मशिनरी नसताना सुद्धा इतक्या उंच इमारती,देवळे त्या काळी बांधली गेली आहेत.बांधकाम पूर्ण झाल्यावर तो मातीचा भराव काढून टाकल्या वर ती संपूर्ण ईमारत देऊळ नजरेस पडत असे.थोडक्यात म्हणजे कोणत्याही अगदी बारीक चुकीला सुद्धा त्या काळी पुन्हा ईमारत बांधते वेळीच वाव रहात नसे.मराठीतील "आधी कळस मग पाया "हि देवळाचे बाबतीत म्हण त्या वरूनच रूढ झाली आहे.आपल्या ह्या फोटोच्या निमित्ताने त्यास आज उजाळा मिळाला. धन्यवाद.

SN said...

प्रभाकर फडणीस ..
tumhala kay problem ahe?
Chatrapati Shivaji mhantalyabaddal?
Nusata shivaji station mhanayala , Shivaji Raje kahi nagarsevak navhate.
Abhiman balaga ya goshtincha..
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay..!!

VIVEK TAVATE said...

!!Chatrapati Shivaji Maharaj ki Jay..!!