बाबा आमट्यानी साकारलेले 'आनंदवन'
कुष्ठरुग्णांना माणूस म्हणून जगण्याचे बळ देणा-या बाबा आमटे यांनी 'आनंदवन'ची सुरुवात केली त्यास ६२ वर्षे झाली आहेत. आनंदवन येथे शून्यातून विश्व निर्माण केले आहे.आनंदवनात कुष्ठरोगी, अंध, अपंग, मुके, बहिरे असे अनेकजण आहेत. श्रमसंस्काराचे आद्य तीर्थक्षेत्र असा आदराने आनंदवनाचे गौरव होते. तेथे श्रमशक्तीमुळेच आनंदवनाच्या बहुतेक गरजा तिथेच भागवल्या जातात.कुष्ठरुग्णांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट फुलवणाऱ्या आमटे कुटुंबातील सलग तिसरी पिढी बाबा आमटे यांनी घालून दिलेला वसा त्याच निष्ठेने चालवीत आहेत.
इथे मुकबधीरांसाठी शाळाही आहे. जिथे आपल्या व्यंगावर मात करणारी स्वप्नंही बघता येतात. इथे चिमुकल्यांची स्वप्न आहेत. उंच भरारी घेणारी.आणि आपल्या भाषेचा अभिमान बाळगणारी.आनंदवनातली अंधशाळेतली महत्वाची शिकवण आहे डोळसांसारखं रहा. डोळसांशी स्पर्धा करा. आनंदनिकेतन, संधीनिकेतन आणि आशा युवाग्राम या संस्था कुष्ठरोग नसलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत. आशा युवाग्राममध्ये शाळा सोडून शिक्षण अर्ध्यावर टाकून दिलेल्या विद्यार्थ्याना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येतं. ही मुलं खेड्यातसुद्धा स्वत:चा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात. तर आनंदनिकेतनमध्ये आजपर्यंत बाहेरच्या विद्यार्थ्यानीही शिक्षण घेतलंय. आनंदनिकेतन सुरू झालं ते वेगळ्याच उद्देशाने..
बाबा व ताईं
श्रध्दावन
डाँ.विकास आमटे
डाँ.भारतीताई आमटे
मुक्तागंण
आनंदवनातील पहाट
आनंदवनातील रुग्ण
आनंदवनातील रुग्ण
आनंदवनातील रुग्ण
आनंदवनातील रुग्ण
आनंदवनातील रुग्ण
आनंदवनातील रुग्ण
आनंदवनातील रुग्ण
सुतकातरणारी महिला
सतरंज़्या विणणा-या महिला
शुभेच्छा पत्रे
स्वरानंदवन
शुभेच्छा पत्रे
1 comment:
या छायाचित्रांना तोड नाही. ती मनाला भिडतात.
Post a Comment