Thursday, December 29, 2011

सोमनाथ प्रकल्प
















बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समितीचे पाच मुख्य प्रकल्प महाराष्ट्राच्या चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्य़ात सुरू आहेत. या सर्व प्रकल्पात बांधवाना आसरा दिलेला असून त्यामध्ये कुष्ठरोग, अंध, अपंग, मूक बधीर, ज्येष्ठ नागरिक, आदिवासी आदींचा समावेश आहे. या प्रकल्पापैकी एक प्रकल्प म्हणजे सोमनाथचा प्रकल्प. १९६७ मध्ये सोमनाथची स्थापना झाल्यानंतर हा प्रकल्प मनुष्यबळ प्रशिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखला जातो.देशभरातून हजारो युवक युवती श्रमसंस्कार छावनी शिबिरात सहभागी होतात. या श्रमसंस्कार छावनीत श्रमाचे महत्त्व पटवून देताना रोज चार तासाचे श्रमदान करून अन्यवेळी विविध तज्ज्ञांद्वारे विविध विषयांची माहिती दिली जाते. सूक्ष्म पाणलोट विकास व जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतजमिनीवर लहान-मोठे प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत.शेतीचा शाश्वत विकास हाच या सामाजिक प्रकल्पाचा ध्यास आहे.


















































































































































1 comment:

Anonymous said...

Many many thanks for snaps and information : AA