Saturday, March 17, 2012

अमृतेश्वर मंदिर




अमृतेश्वर मंदिर

रतनवाडीमधे एक अद्भुत मंदिर आपल्याला पहायला मिळते. १० व्या ११ व्या शतकामधे झांज राजांनी १२ नद्याच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळील अमृतेश्वर मंदिर.

अमृतेश्वर मंदिराच्या नुसत्या दर्शनानेही आपला दिवसभराचा थकवा दूर होतो. भुमिज पद्धतीचे हे मंदिर शिल्पकलेने नटलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाला दोन्ही बाजुला दरवाजे आहेत ही रचना वैशिष्ठ पुर्ण आहे.
रतनवाडीला जाऊन १२०० वर्षापूर्वीचे अमृतेश्वर मंदिर हे कोरीव कामाबद्दल प्रसिद्ध मंदिर पहावे.
रतनगडाच्या पायथ्याशी व अमृतवाहिनी प्रवरेच्या किना-यावर अमृतेश्वराचे अप्रतिम कोरीव शिल्पकलेचा नमुना असलेले मंदिर आहे. इ.स.११व्या शतकातील एक प्राचीन मंदिर होय. चालुक्य शैलीतील हे मंदिर म्हणजे अप्रतिम शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे. सामुहिक पूजा आणि प्रार्थना करण्याच्या दृष्टीने मंदिराची रचना करण्यात आली आहे. मोठ्या वाद्याप्रमाणे मंदिराची रचना असून मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार थेट मंदिराच्या गर्भगृहातच उघडते.
मंदिराच्या भिंतीवरचे कोरीव काम विविध मूर्ती, प्रवेशद्वारावरील मैथुन शिल्पे व देवदेवतांच्या कोरीव मूर्ती, छतावरील समुद्र मंथनाची दृश्ये, शिवपूजेचा देखावा, नृत्य शिल्पे, नक्षीकाम अत्यंत सुंदर व विलोभनीय आहे.

१५ ते १६ मीटर उंच चुना विरहित देवदेवतांच्या कोरीव जोडकाम केलेले हे मंदिर पूर्ण दगडी असून त्याची लांबी २३ मी. व रुंदी १२ मी आहे. मंदिराच्या जवळ चौरस बांधणीची व पाय-या पाय-याची पुष्करणी आहे. कुंडाच्या कडेला १२ देवळ्या असून त्यात गदाधारी, चक्रधारी व शेषधारी अशा भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत.

अमृतेश्वराची पिंढी नेहमीच पाण्य़ातच असते.