रुपया हा शब्द संस्कृत मधील रुपे या शब्दापासून आला आहे.
भारताच्या स्वातंत्र्य मिळण्याचे निश्चित झाल्यावर नाण्यांमध्ये थोडा बदल करण्यात आला.
१९५० साली मात्र पूर्णपणे भारतीय नाणी तयार करण्यात आली. ही नवी नाणी चांदीची नव्हती
पण त्यांचे रुपया हे नाव मात्र स्वीकारण्यात आले.ब्रिटीश राजे-राण्यांचे चित्र काढून टाकण्यात आले.
आता त्याऐवजी चारही दिशांकडे पाहणारे चार सिंहाचे मानचित्र आले. १९५७ सालानंतर आणखी बदल
करून एक रुपाचे १०० पैसे असे प्रमाण ठरविण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत नाण्यांच्या धातू,
वजन वगैरे मध्ये वेळोवेळी बदल होत गेले.

आपल्या चलनातील नविन पितळेची नाणी जमवून त्या नाण्यांचे फोटो काढावयासे वाटले.
No comments:
Post a Comment