Sunday, April 29, 2012

चालणारी मडंळी
















           पायी चालणे हा अतिशय सुंदर व्यायाम आहे.सतत गाडी वापरण्यामुळे पायी चालणे आपण जवळपास विसरून चाललो आहोत.पाठीचे दुखणे, ह्रदयरोग, उच्च रक्तदाब, श्वासाचा त्रास हे सर्व नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणे फायदेशीर ठरते.चालणे हे धावण्यापेक्षा चांगले आहे कारण धावल्यामुळे लवकर थकवा येतो आणि सांधेदेखील दुखावण्याची शक्यता असते.व्यायामातील सर्वोत्तम व्यायाम चालणे हा होय. कारण त्यासाठी कुठल्याही साधनांची गरज नाही. रोज पाच किलोमीटर चालल्यास आपण आयुष्यात कायम तंदुरुस्त राहातो. महत्त्वाचा फायदा म्हणजे चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. रोज दहा हजार पावले चालणे हा दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.चालण्यामुळे तणाव कमी होतो. झोपही चांगली लागते. चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. दिवसभर काम करून आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो. शिवाय हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते. साधारणपणे रोज 30 मिनिटे चालल्यास दोनशे कॅलरी खर्च होतात. शिवाय कोणताही त्रास होण्याची शक्‍यता नसते. त्याचप्रमाणे कोणत्याही वयात आपण हा व्यायाम करू शकतो. अनवाणी चालण्यात मला जे सुख मिळते ते मी निसर्गाशी एकरूप आहे ह्याचा विचार मनात येऊन मला मिळते.    प्रत्येकाला चालणे गरजेचे आहे.











































































No comments: