'दशावतार' ही कोकणातील लोकप्रिय लोककला आहे.
कोकणातल्या अस्सल मातीतली एक प्रमुख प्रभावी लोककला
म्हणून ओळखल्या जाणार्या या दशावताराला पाचशे वर्षांची
परंपरा आहे.दशावतार गावोगावी जाऊन सादर करणे हा
कोकणातील देवळी,तसेच लिंगायत आणि गुरव समाजाचा
व्यवसाय होता.दशावतार सादर करणारे कलावंत,एकलव्यासारखे
स्वत:च शिकतात.इथे कोणतीही गोष्ट शिकविली जात नाही.
प्रत्येकाने स्वत:च घडत जायचे.सूत्रधाराकडून मंडळातील
सर्व कलाकारांना रंगभूषा करण्यापूर्वी एकत्र बसवून आख्यानाची
कल्पना दिली जाते, भूमिका वाटून दिल्या जातात.
No comments:
Post a Comment