' गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या '
असा जयघोष ढोल - ताशांचा निनाद ... पारंपरिक लेझीम पथके ... बेन्जो - डीजेचा ' साऊंड '
सोबतीला फटाक्यांची आतषबाजी अशा जल्लोशात आणि तितक्याच भावपूर्ण वातावरणात
शनिवारी मुंबईसह उपनगरातल्या चौपाट्यांवर गणरायाला निरोप देण्यात आला .
अकरा दिवसांचा पाहुणचार आटोपून गावी निघालेल्या बाप्पांना निरोप देताना
गणेशभक्तांची अवस्था ' चैन पडेना आम्हाला ' अशीच झाली होती .
' पुढच्या वर्षी लवकर या '
No comments:
Post a Comment