आश्विन शुक्ल प्रतिपदासे नवरात्रोत्सव आरंभ होता.नवरात्रोत्सवमें घटस्थापना होते.
हेमंत ऋतूच्या आरंभी नवरात्रोत्सव सुरू होतो.या उत्सवाच्या काळात सर्वत्र मंगलमय
वातावरण असतं. भक्ती आणि आनंद यांचा अनोखा मिलाफ याच काळात दिसून येतो.
देवी ही केवळ सुंदर ध्यान किंवा बुद्धीचं रूप नसतं तर ती भ्रांती म्हणजे मनाचे गोंधळ
करणारेही रूप आहे.ती केवळ मुबलक स्वरूपातील लक्ष्मी नाही तर, भूक म्हणजे क्षुधा,
तहान म्हणजे तृष्णाही आहे. देवीची ही सर्व रूपे लक्षात घेतल्यावरच आपल्यात समाधीची
भावना निर्माण होते.
नवरात्रोत्सवाचा काळ म्हणजे आत्मपरीक्षणाचा काळ असतो. याच काळात निसर्गाचा
कायापालट घडून येतो. आपलं जुनं रूप टाकून नवं रूप धारण करण्याचा हा काळ.
नवरात्रोत्सवाच्या काळात झालेल्या ज्ञानाचा दहाव्या दिवशी विजयादशमीने सन्मान केला जातो.
ठाण्यातील काही प्रसिध्द नवरात्रोत्सवाचे फोटो
No comments:
Post a Comment