Thursday, March 14, 2013

परदेशी पाहुणे (फ्लेमिंगो)रोहीत पक्षी



फ्लेमिंगो हा सध्या मुंबईतला सर्वात फेमस प्रसिद्ध पक्षी आहे. 
शिवडी-माहुल खाडीचा परिसर सध्या लालबुंद-सफेद रंगाच्या फ्लेमिंगो पक्ष्यांनी बहरून गेला आहे. सुमारे चाळीस हजार फ्लेमिंगो पक्षी शेकडो किलोमीटरचे हवाई अंतर पार करून ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईत दाखल झाले आहेत.

फ्लेमिंगो हा सध्या मुंबईतला सर्वात फेमस प्रसिद्ध पक्षी आहे. स्थलांतर म्हटलं की, लगेच लोकांच्या डोळ्यांसमोर येतात ते फ्लेमिंगो पक्षी. पक्ष्यांची स्थलांतरे वेगवेगळ्या ठिकाणांहून होत असतात. मुंबई परिसरात ३० ते ४०,००० फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी हिवाळ्यात दाखल होतात. हे पक्षी केनियाहून येतात असा एक समज सर्वत्र असतो. पण आता पक्षीनिरीक्षकांच्या सततच्या अभ्यासाने हे लक्षात आलेले आहे की, हे पक्षी हिंदुस्थानीच आहेत आणि ते स्थानिक स्थलांतर करतात. विणीसाठी कच्छच्या रणात जातात आणि तिथूनच सर्वत्र पसरतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, माळशेज अशा अनेक ठिकाणी पाणथळ जागी आपण हे पक्षी बघू शकतो.






















































































































 

No comments: