चैत्र महिना आणि वसंत ऋुतू यांचं नातंचं इतकं घट्ट आहे की
चैत्रातली पालवी म्हणावी की वसंताचा बहर म्हणावं असा प्रश्न पडतो.
प्रत्येक झाडाला नवी पालवी येते.त्याचा वास देहाला मोहर आणणारा असतो.
शिशिर ऋतूला निरोप देऊन चैत्र ऋतूराज वसंताला घेऊन येतो.चैत्रात साऱ्या सृष्टीला
नवचैतन्य प्राप्त होते.वृक्षांना पालवी फुटते.हिरव्या रंगातही विविध छटा दिसतात.काही
वृक्षांवर सुंदर फुले येतात तर काही फळांनी संपन्न होतात.
No comments:
Post a Comment