सीगल्स हे कबुतराच्या जातीचे पक्षी, बहुतांशी ते समुद्र किनारी आढळतात.
आक्रमक असलेले सीगल्स आपल्या हद्दीत आलेल्या अनोळखी पक्ष्यांना
एकत्रित हल्ला करून हुसकावून लावतात. असा हा कृष्ण धवल तरीही
दिसायला देखणा सीगल छायाचित्रकारांना नेहेमीच आकर्षित करणारा
पक्षी आहे.सीगल्स ऊर्फ कुरव असे त्यांचे नाव! हिवाळय़ाची चाहूल लागली,
की या किनाऱ्यावर हे सीगल्स पक्षी हजारोंच्या संख्येने येतात.
चाणाक्ष मासेमार असलेले हे पक्षी पाण्यावर थोडा वेळ चक्क तरंगू शकतात ...!!
घोळक्याने राहणारे हे पक्षी काबुताराप्रमाणेच बऱ्यापैकी माणसाळतात.
अलिबागला लाँचने प्रवास करताना हे पक्षी कायम साथ देत असतात.
काही मिळतो का? या प्रतिक्षेत हा त्यांचा प्रवास सुरु असतो.यांचे
फोटो काढणे अवघड आहे.
No comments:
Post a Comment