महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरु म्हणजे थोडक्यात उडणारी मोठी रंगीत खारच.
सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेलं भीमाशंकरचं गर्द जंगल. म्हणूनच या जंगलात झाडांच्या दाटीत शेकरु म्हणजेच जायट स्कवीरलची घरटी सापडतात. पण या दिमाखदार अशा जंगलाची शान हरवत चालली आहे.या जंगलात राक्षसी खार / उड्णारी खार म्ह्णजेच शेकरु पाहायला मिळते.
शेकरु वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरु सहा ते आठ घरे तयार करते. एका झाडावरुन दुसर्या झाडावर सहज झेप घेणारे शेकरु १५ ते २० फुटांची लांब उडी मारु शकते. डहाळी व पानं वापरून गोलाकार आकाराचे घरटे शेकरू बनवते.
हे शेकरुचे फोटो मी प्रकाश आमटे याच्या लोकबिरदरी हेमलकसा या प्रकल्पातील प्राणीसंहग्रलयात काढलेले आहेत.
खारुताई व शेकरु
सुंदर आणि चपळ प्राणी.चपळाईने आपल्या ढोलीत खाऊ घेऊन जाणारी खारुताई तुमचे लक्ष पटकन वेधून घेते.तिची चपळाई पहात राहविशी वाटते.कायम झाडांवर राहणारी खुप वेळा अन्न गोळा करण्यासाठी जमीनीवर येते पण पटकन पुन्हा झाडावर चढते.
सेतू बांधण्यास खारुताईनी खारीचा वाटाची मदत केली म्हणुनच श्रीरामाने आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी खारुताईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.तेव्हा खारुताईच्या पाठीवर देवाच्या बोटांचे ठसे उमटले.
उन्हाळ्यात त्या जमीन उकरून तेथे अन्न साठवून ठेवतात आणि हिवाळ्यात हेच अन्न काढून खातात. यापैकी न खाल्लेल्या काही बिया व दाणे जमिनीत तशाच राहतात. खारींच्या या सवयीमुळे वनसंवर्धनास मदत होते.
No comments:
Post a Comment