लहान मुलांना खेळणी ही मुळातच आवडत असतात.
लहान मूल जेव्हापासून खेळू, बागडू लागते,
तेव्हापासूनच त्याच्या अवतीभोवती दिसणार्या असंख्य चल, अचल अशा वस्तू त्याला दिसतात.
मुलांच्या खेळाची व करमणुकीची रंगीबेरंगी साधने ही चेंडूसारखी साधी किंवा बाहुल्या,गाड्या,प्राण्यांची चित्रे यांसारखी प्रतीकात्मक असतात.
मुलांच्या खेळण्यातही खूप विविधता आली.
कोणत्याही घरात लहानग्याचा वाढदिवस म्हटले की,
त्याला पाहुण्यांकडून भेटीदाखल खेळणी दिली जाणे हे ओघाने आलेच.
छोट्यांच्या,तसेच मोठ्यांच्या जीवनातही खेळाला फार मोठे महत्त्व आहे.
पुरातन कालापासून तत्कालीन संस्कृतीत खेळाचा उल्लेख सापडतो.
मुलगी असली,की भातुकली,बाहुल्या किंवा हस्तकलेच्या वस्तू अन् मुलगा असेल,
तर मेकॉनो किंवा ब्लॉक्सचे खेळ दाखवायचे.
खेळण्याच्या दुकानात सहजतेनं मुलगा-मुलगी भेदभाव होतात.
मुलाची शारीरिक, सामाजिक, मानसिक, तसेच बौद्धिक जडण-घडण आणि वाढ होण्यासखेळणी फारच उपयुक्त ठरतात. खेळ खेळता खेळता इतर मुलांसमवेत सहकार्याने आणि खेळीमेळीने खेळण्यास मूल आपोआप शिकते.
No comments:
Post a Comment