Thursday, September 18, 2014

ब्रह्मकमळ - एक निसर्ग चमत्कार




फुल म्हटलं की पहिल्यांदा डोळयासमोर येतो तो फुलांचा राजा 'गुलाब'. आपल्या वेगवेगळया रंगांनी आणि सुवासानी तो आपल्याला आकर्षित करतो. कोणत्याही फुलांनी केलेले सुशोभिकरण गुलाबाशिवाय पूर्णच होत नाही. गुलाब,ऑस्टर,निशिगंध,जाई-जूई,अबोली ही फुले आपण नेहमीच पाहतो .







पण काही फुलांबद्दल आपल्याला एक वेगळंच आकर्षण आणि कुतूहल असते. 'ब्रम्हकमळ' हेही एक असंच फुल. 







हे फुल आपल्याला सहजच कुठेही बघायला मिळत नाही. हे फुल खुप सुंदर असतं आणि ते बघायला मिळावे अशी ब-याच जणांची इच्छा असते. त्यामुळे ज्यांच्याकडे हे फुल येतं, ते त्या परिसरात प्रसिध्द असतात.








पांढरेशुभ्र आणि मंद सुगंधाचं हे फुल पाहणे ही पर्वणीच होऊन जाते. हे फुल मध्यरात्री पूर्णपणे उमलते.






ब्रम्हकमळाचा पांढरा शुभ्र रंग आपल्याला पटकन आकर्षित करतो. हे फुल मोठं पण खूपच नाजूक असतं. 





या फुलाच्या मऊ मुलायम आणि काहीशा पारदर्शक पाकळया मन मोहून टाकतात. फुलाच्या मध्ये असंख्य पुंकेसर आणि त्याचे तंतू असतात या पुंकेसरांच्या मधोमध असतो कुक्षीवृंत. कुक्षीवृंताच्या टोकाशी असणा-या चांदणीसारख्या कुक्षी पण फुलासारख्याच वाटतात. 





ब्रम्हकमळ रात्री पूर्णपणे उमलतं, हे त्याचे मुख्य वैशिष्टय आहे. पूर्ण उमलल्यावर त्याचा मंद सुगंध सगळीकडे पसरतो. 






 श्रावणाच्या आगमनाने निसर्गात अनेक गोष्टी घडत असतात त्यातलीच एक म्हणजेच वर्षातून एकदाच उमलणारे ब्रम्हाकमळ. शहरात घरोघरी वर्षभर या झाडाची जोपासना केली जाते. श्रावणामध्ये ब्रम्हकमळाला फुले येतात .




काल दि.१७ सप्टेंबर रोजी माझ्या घरी ’ ब्रह्मकमळ ’ फुलले होते.



No comments: