Wednesday, October 1, 2014

फुलांवर उडती फुलपाखरे...

निसर्गाने विविध माध्यमांतून रंगांची उधळण करीत सृष्टीचं सौंदर्य खुलवलं आहे. 
फुलपाखरे म्हणजे हे त्याचेच एक उदाहरण.. विविध प्रकारची फुलपाखरे निसर्गप्रेमींना मोहवून टाकतात.
फुलपाखरू बघितले तरी कोणाचेही मन मोहित होते.फुलपाखरे म्हटली की, आपल्याला त्यांचे रंगीबेरंगी रंग आणि त्यांचे स्वच्छंदपणे हवेत बागडणे पटकन लक्षात येते. 






श्रावणाच्या शेवटी शेवटी पठारांवरून, झाडींमधून भटकंती. श्रावणातलं निसर्ग सौंदर्य, ऊन-पावसाचा खेळ! तऱ्हेतऱ्हेच्या फुलांनी, गवतांनी आच्छादलेली जमीन किती मोहक! गवत फुलांवर, झुडपांवर इवलाली फुलपाखरं आपल्या नाजूक पंखांनी उघडमीट करत भिरभिरती. 







फुलपाखरांना सात्त्विक वातावरण आवडते; म्हणून ती मनुष्यवस्तीपेक्षा दूर असलेल्या निसर्गात अधिक प्रमाणात आढळतात. 








फुलपाखरे म्हटली की, आपल्याला त्यांचे रंगीबेरंगी रंग आणि त्यांचे स्वच्छंदपणे हवेत बागडणे पटकन लक्षात येते.





फुलाफुलांवर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे कुणाला आवडत नाहीत? बागेत हुंदडणार्‍या लहान मुलांचे तर ते खेळगडी बनून जातात. फुलपाखरे फुलबागांची आकर्षकता वाढवितात. त्यांच्या सौंदर्यात भर घालतात. फुलपाखरांचे निरीक्षण हा एक छंद होऊन बसतो  ...






सडा पडलाय् जाईखाली, पहाटेच कसली वावटळ आलेली? सुगंधाचा निरोप ऐकून, झुंड फुलपाखरांची लोटली.’





निसर्गाने प्रत्येक सजीवाला कोणते ना कोणते अलौकिकत्व बहाल केलंय. मानवी मनाला सहज भुरळ घालणाऱ्या फुलपाखरांच्या वाट्याला अभिजात सौंदर्य आलंय. वेली-फुले-झाडांवर खेळणाऱ्या, बागडणाऱ्या फुलपाखरांची दुनिया अद्भूत आणि चमत्कारीकही आहे. 







ऋतुचक्र पुढे सरकते. तसे निरनिराळ्या ऋतुंचे निरनिराळे सोहळे निसर्गाच्या अंगणात रंगतात. पावसाळ्यातल्या रमणीय जलोत्सवच्या अखेरीस निसर्गाच्या बागेत नक्षीदार, मखमली पंखांचे वरदान लाभलेली देखणी फुलपाखरे स्वच्छंदीपणाने उडताना-बागडताना दिसू लागतात. ऑक्टोबर ते डिसेंबर हे दिवस तर फुलपाखरांचेच असतात.



















प्रयत्नांची गरज आहे. फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक असलेल्या वनस्पतींची अधिक जाणीवपूर्वक लागवड केली जावी. तरच आपल्या अवतीभवती फुलपाखरे बागडू शकतील















फुलपाखरांचे जीवनचक्र मोठे गमतीशीर, वेगळे आहे. फुलपाखरांचा समावेश कीटक वर्गामध्ये होतो. थंड रक्ताच्या या पंखाधारी किटकाला सहा पाय असतात. त्याचे शरीर डोके, छाती आणि पोट असे बनलेले असते. विशिष्ट प्रकारच्या झाडांवर फुलपाखरांच्या माद्या अंडी घालण्यास येतात. झाडांची पाने खावून अळ्या वाढतात. त्यानंतर त्याचा कोष तयार होतो. कोष वरून दिसताना मृतावस्थेत दिसतो. पण आत मात्र जीव असतो! हवामानात आवश्यक ते अनुकूल बदल झाले की, आपोआप कोषातून फुलपाखरे बाहेर येतात. बाहेर आलेली फुलपाखरे पुन्हा अंडी घालतात. अंडी-अळी-कोष-फुलपाखरू-अंडी... असे जीवनचक्र सदोदित सुरु राहते.





                         


                                 
हात लावता पंख फाटतील
दोरा बांधुनी पाय तुटतील
      घरी कशी मग सांगा जातील
      ही देवाची मुले
फुलांवर उडते फुलपाखरू
छान किती दिसते फुलपाखरू
फुलांवर उडते फुलपाखरू ... 







No comments: