Sunday, May 1, 2011

राणीची बाग

मुंबई- सिमेंटच्या जंगलात वाढलेल्या मुंबईकरांना जंगली प्राण्यांची ओळख करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजे भायखळ्यातील राणीचा बाग अर्थातच वीर जिजामाता उद्यान.केवळ पुस्तकात पाहायला मिळणा-या प्राण्यांची खरी ओळख व्हायची ती या उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात. त्यामुळे शाळेची एक तरी सहल या बागेत असायचीच. तेव्हा राणीच्या बागेचा थाटही न्याराच होता. पण गेल्या काही वर्षापासून राणीच्या बागेचं सगळं ऐश्वर्यच जणू संपलं आहे.राणीच्या बागेत सध्या हत्ती, माकड, हरण, मगर, सांबर, नीलगाय, विविध जातींचे साप आणि पक्षी पाहण्यास मिळतात. वाघ, सिंह यांची सोय इतरत्र करण्यात आली आहे, परंतु सध्या येथे असलेल्या प्राण्यांची नीट काळजीच घेतली जात नाही.बिटिशांच्या काळात 1861 मध्ये 52 एकर भागात विकसित करण्यात आलेले जिजामाता उद्यान 150  वर्षांचे जुने उद्यान आहे.दररोज सुमारे आठ ते दहा हजार पर्यटक उद्यानाला भेट देतात. येथील झाडांच्या विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी येणा-या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
















































































1 comment:

Kamlesh R said...

since my child hood thaousand times i visted , but last many years i have not gone there,the view i seen is realy world class and thanks for giving to giving this beautyful potos.