Friday, March 30, 2012

बांगडया







हिंदूंच्या दृष्टीने हिरव्या बांगडया व कुंकू हे सौभाग्याचे लक्षण आहे.
नववधूला चुडा भरतात. चुडा म्हणजे हिरव्या रंगाच्या साध्या कांचेच्या बांगडया,
त्यावर कोणतेही सोनेरी नक्षीकाम नसते. 
चुडा भरताना एकेका हातात सात-सात किंवा नऊ-नऊ बांगडया घालतात.
बांगडया अथवा काकण हे मनगटावरचे सर्वात प्रमुख आभूषण.
महाराष्ट्रात अगदी लहानपणापासूनच मुलींच्या हातात बांगडया घातल्या जातात.
महाराष्ट्र  कंकणाला 'सौभाग्य अलंकार' म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.