मुंबईहून रात्री निघून रेल्वेने दुस-या दिवशी सकाळी उज्जैन येथे उतरुन महाकालेश्वराचे दर्शन घेतले. उज्जैन येथे गोड गोड जेवण करुन इंदूरकडे प्रयान केले.मघ्ये गारांचा पाऊस पडला.वातावरण एकदम थंड झाले. प्रवासात मजा आली. दोन्ही बाजुने गव्हाच्या पिकाची शेत डोलत होती. इंदूरला पोहचल्या नतंर होलकरांच्या वाड्याला भेट दिली.प्रसिध्द खाऊ गल्लीत खाण्याची मजा घेतली.या खाऊ गल्लीतील चँट पदार्थ विशेष आहेत.
महागणपती मंदीरात जाऊन गणपती दर्शन घेऊन ओंकारेश्वर कडे निघालो.प्रथम नर्मदेचे दर्शन झाले.नर्मदेच्या एका काठावर नेऊन सोडले. मंदिरात जाण्यासाठी नर्मदा नदीवर एक सेतू पादचार्यांसाठी बांधलेला आहे. कोणतीही गाडी त्यावरून जाऊ शकत नाही. पायी जायाचे नसल्यास मंदीराच्या घाटावर
जाण्यासाठी छोट्या बोटीची सोय आहे. नर्मदेच्या प्रवाहासह बोटीतला प्रवास मजेशीर असतो.
जाण्यासाठी छोट्या बोटीची सोय आहे. नर्मदेच्या प्रवाहासह बोटीतला प्रवास मजेशीर असतो.
भारतात मध्यप्रदेश राज्यात इंदूरजवळ ओंकारेश्वर हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. दुस्थानातील बारा ज्योतीर्लिंगापैकी हे एक जाज्वल्य शिवस्थान आहे. ॐकारेश्वर ची निर्मिती नर्मदा नदी पासून झाली आहे. ही नदी भारताची अत्यंत पवित्र नदी आहे.
नर्मदा व कावेरी नद्यांच्या संगमावर ओंकाराच्या आकाराचे हे एक बेट आहे.बोटीने या बेटाला परीक्रमा करता येते.नर्मदेच्या प्रवाहात बोटीने परीक्रमा करीत असताना संगमावर उतरून आंधोळ करुन प्रवित्र झालो. पुढची परिक्रमा कावेरीच्या प्रवाहाच्या विरोधात प्रवास करीत ओंकारेश्वाराच्या घाटावर उतरलो.
तीन प्रवेशद्वार असलेले ओंकारेश्वर मंदीर तीन मजल्यांचे आहे. मंदिराचे प्रवेशद्वार उत्तरेला असून गाभार्यातील प्रवेश गुहेप्रमाणे आहे.मंदीराच्या गाभार्यात स्वयंभू शिवलिंग खोलगट शाळूंकेत आहे.शिवलिंगाच्या चहुबाजुला सदैव पाणी भरलेले असते.दर्शनला नेहमीच गर्दी असते.
मंदीर उंचावर असल्याने बाजुचा विलोभनीय परीसर पाहु शकतो.तेथुन नर्मदेवरील ओंकारेश्वर धरण दिसते. नर्मदच्या दुस-या काठावर गजानन महाराज्याचे सुंदर मंदीर जरुर पाहावे.मंदीर परीसरातील स्वछता पाहण्यासारखी आहे.दर्शन घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
कावेरीचा प्रवाह
नर्मदा नदीवरील ओंकारेश्वर घरण
धार्मिक व ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे असलेले नर्मदाकाठचे हे निसर्गरम्य ठिकाण खरोखरच पहाण्यासारखे आहे.
नर्मदा नदीतून प्रवास
No comments:
Post a Comment