Thursday, February 6, 2014

एलिफंटा गुफा



घारापुरी गुफा किंवा एलिफंटा केव्हज् या जगप्रसिद्ध ठिकाणी असलेल्या भगवान शंकराच्या कोरीव शिल्पांचे त्या मूर्तींमधील विविध भावमुद्रा.

मुंबईच्या पूर्वेस ११ किलोमीटर अंतरावर आहे. सुमारे सात कि.मी. लांबीच्या निसर्गसंपन्न बेटामध्ये ही जागतिक दर्जाची शैव लेणी खोदलेली आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील वास्तुशिल्पाचा शेवटचा उत्कृष्ट नमुना म्हणजे घारापुरीची लेणी! शैव संप्रदायांनी उभारलेली ही अक्षय गुहामंदिरे ही हिंदुस्थानाची गौरवशाली शिल्पसंपत्ती आहे.









दगडमातीने बनलेल्या त्या बेटाचे प्राचीन नाव ‘श्रीपुरी’. म्हणजेच संपत्तीचे माहेरघर. त्यानंतर ‘अग्रहारपुरी’ या नावाचा अपभ्रंश ‘घारापुरी’ झाला असावा. ‘घारापुरी’ म्हणजेच तटबंदीचे शहर












शैव-लेणी नेमक्या कुठल्या कालखंडात निर्माण झाली, याबद्दल अनेक तज्ज्ञ पुरातत्त्व मंडळींमध्ये मतभेद आहेत. कारण घारापुरी परिसरात माहिती देणारा एकही शिलालेख किंवा ताम्रपट अद्याप मिळालेला नाही.












 प्रांगणातून प्रवेश केल्यावर २६ स्तंभांचे ऐसपैस दालन दृष्टीस पडते. प्रांगणात उभे राहिल्यावर लेण्यांच्या भव्यतेची कल्पना येते. 




















 सभामंडपात प्रवेश करताच सर्वप्रथम योगीश्वर शिव ही मूर्ती दिसते. बरासचा भाग भग्नावस्थेत आहे. शिव पद्मासनात असून कमळावर विराजमान आहेत. खरे तर हे प्रतीक बौद्धाचे वाटते. 










ही शिल्पे विशिष्ट गोलाईत असल्याने आपण जणू त्रिमिती (३-डी) चित्रमालिका पाहात आहोत, असा भास होतो आणि आपण नतमस्तक होतो. येथील सर्व शिल्पांना चैतन्याचा वरदहस्त लाभला आहे. त्यामुळे ही सारी शिल्पे जणू आपल्याशी हितगुज करतात.







आता आपण नतमस्तक होणार आहोत त्या विश्वविख्यात महेश त्रिमूर्ती या अजोड शिल्पकृतीपुढे. एकसंध प्रस्तरात इतक्या भव्य-दिव्य आकाराचे शिल्प अवघ्या हिंदुस्थानात नाही. त्रिमूर्तीची एकूण उंची ५.४६ मीटर आहे व रुंदीही तेवढीच. त्रिमूर्तीचा मस्तक व छातीपर्यंतचा भाग शिल्पित करण्यात आला आहे.
 मूर्तीमध्ये शिवाचे रौद्र, ध्यानस्थ, धीरगंभीर व शांत भाव अचूक टिपला आहे.  महेशमूर्ती विश्वातील एक अमर शिल्प म्हणून ओळखली जाते.























































No comments: