Showing posts with label पक्षी. Show all posts
Showing posts with label पक्षी. Show all posts

Friday, May 2, 2014

रोहित पक्षी......फ्लेमिंगो




हा पक्षी उडतो तेव्हा त्याच्या भव्य पंखांची काळी किनार आणि आतील पंखांचा ज्वाळेसारखा लालभडक/शेंदरी रंग अगदी खुलून दिसतो. म्हणून त्याला इंग्रजीत फ्लेमिंगो म्हणतात.रोहित पक्षी 


















उंच, वर्णाने गुलाबीसर पांढरा, लांब काटकुळे पाय, उंच आजोबाच्या काठीसारखी नागमोडी मान, गुलाबी जाडसर मधूनच तुटल्यासारखी अशी अजबच आकाराची चोच, आखूड शेपूट असे या रोहित पक्ष्याचे रूप.रोहित, 






















एकटा-दुकटा न राहता मोठा थवा करून खार्‍या पाण्याच्या पाणथळ जागा, उथळ पाण्याचे तलाव, दलदलीचा प्रदेश, सरोवरे, खाडी, खाजणीच्या जागेत मोठ्या संख्येने दिसतो.













































Sunday, May 12, 2013

पक्षांची समुद्र सफर....सीगल्स पक्षी




सीगल्स हे कबुतराच्या जातीचे पक्षी, बहुतांशी ते समुद्र किनारी आढळतात.
  आक्रमक असलेले सीगल्स आपल्या हद्दीत आलेल्या अनोळखी पक्ष्यांना
   एकत्रित हल्ला करून हुसकावून लावतात. असा हा कृष्ण धवल तरीही
     दिसायला देखणा सीगल छायाचित्रकारांना नेहेमीच आकर्षित करणारा
      पक्षी आहे.सीगल्स ऊर्फ कुरव असे त्यांचे नाव! हिवाळय़ाची चाहूल लागली,
       की या किनाऱ्यावर हे सीगल्स पक्षी हजारोंच्या संख्येने येतात.
        चाणाक्ष मासेमार असलेले हे पक्षी पाण्यावर थोडा वेळ चक्क तरंगू शकतात ...!!
           घोळक्याने राहणारे हे पक्षी काबुताराप्रमाणेच बऱ्यापैकी माणसाळतात.



 अलिबागला लाँचने प्रवास करताना हे पक्षी कायम साथ देत असतात.
  काही मिळतो का? या प्रतिक्षेत हा त्यांचा प्रवास सुरु असतो.यांचे
    फोटो काढणे अवघड आहे.

































































Thursday, March 14, 2013

परदेशी पाहुणे (फ्लेमिंगो)रोहीत पक्षी



फ्लेमिंगो हा सध्या मुंबईतला सर्वात फेमस प्रसिद्ध पक्षी आहे. 
शिवडी-माहुल खाडीचा परिसर सध्या लालबुंद-सफेद रंगाच्या फ्लेमिंगो पक्ष्यांनी बहरून गेला आहे. सुमारे चाळीस हजार फ्लेमिंगो पक्षी शेकडो किलोमीटरचे हवाई अंतर पार करून ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईत दाखल झाले आहेत.

फ्लेमिंगो हा सध्या मुंबईतला सर्वात फेमस प्रसिद्ध पक्षी आहे. स्थलांतर म्हटलं की, लगेच लोकांच्या डोळ्यांसमोर येतात ते फ्लेमिंगो पक्षी. पक्ष्यांची स्थलांतरे वेगवेगळ्या ठिकाणांहून होत असतात. मुंबई परिसरात ३० ते ४०,००० फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी हिवाळ्यात दाखल होतात. हे पक्षी केनियाहून येतात असा एक समज सर्वत्र असतो. पण आता पक्षीनिरीक्षकांच्या सततच्या अभ्यासाने हे लक्षात आलेले आहे की, हे पक्षी हिंदुस्थानीच आहेत आणि ते स्थानिक स्थलांतर करतात. विणीसाठी कच्छच्या रणात जातात आणि तिथूनच सर्वत्र पसरतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, माळशेज अशा अनेक ठिकाणी पाणथळ जागी आपण हे पक्षी बघू शकतो.






















































































































 

Friday, February 10, 2012

कोंबडा






          पहाटेला कोबंडा आरवला की गावक-यांच्या दिवसाला सुरुवात होते.

                पुर्वी कोंबड्याचे आरवणे हे एक घड्याळच होते.

                        ऐटीत चालणारा कोंबडा दिसायला सुंदर असतो.

                              गांवकरी आपल्या आजुबाजुचा परीसर स्वच्छ राहण्यासाठी कोंबड्या पाळतात.   




















































Monday, December 19, 2011

पक्षी











पक्षी वेगवेगळ्या रंगाचे असल्याने ते मोहक दिसतात.
     स्वच्छदी उडताना व बागडताना पाहण्यास आनंद असतो.
       त्यांची चलबिचल कँमे-यात पकडणे मोठे आव्हान असतो.
        त्यासाठी सयम बाळगल्यास आपल्याला चागंले फोटो मिळतील.






































































































Monday, March 7, 2011

चिमणी

खिडकीत चिमणी बसली.इकडे तिकडे टुक़ुटुकत पाहत होती.
चुलबुल सुरु होती.जराही स्थिर होत नव्हती.खुपवेळा पाहिले
व नतंर कँमे-यात बदिस्त केले.