Showing posts with label प्राणी. Show all posts
Showing posts with label प्राणी. Show all posts

Friday, June 14, 2013

खारु आणि शेखरु


महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरु म्हणजे थोडक्यात उडणारी मोठी रंगीत खारच.

सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेलं भीमाशंकरचं गर्द जंगल. म्हणूनच या जंगलात झाडांच्या दाटीत शेकरु म्हणजेच जायट स्‌कवीरलची घरटी सापडतात. पण या दिमाखदार अशा जंगलाची शान हरवत चालली आहे.या जंगलात राक्षसी खार / उड्णारी खार म्ह्णजेच शेकरु पाहायला मिळते.

शेकरु वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरु सहा ते आठ घरे तयार करते. एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर सहज झेप घेणारे शेकरु १५ ते २० फुटांची लांब उडी मारु शकते. डहाळी व पानं वापरून गोलाकार आकाराचे घरटे शेकरू बनवते.

हे शेकरुचे फोटो मी प्रकाश आमटे याच्या लोकबिरदरी हेमलकसा या प्रकल्पातील प्राणीसंहग्रलयात काढलेले आहेत.





















































खारुताई व शेकरु

  सुंदर आणि चपळ प्राणी.चपळाईने आपल्या ढोलीत खाऊ घेऊन जाणारी खारुताई तुमचे लक्ष पटकन वेधून घेते.तिची चपळाई पहात राहविशी वाटते.कायम झाडांवर राहणारी खुप वेळा अन्न गोळा करण्यासाठी जमीनीवर येते पण पटकन  पुन्हा झाडावर चढते.

  सेतू बांधण्यास खारुताईनी खारीचा वाटाची मदत केली म्हणुनच श्रीरामाने आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी खारुताईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.तेव्हा खारुताईच्या पाठीवर देवाच्या बोटांचे ठसे उमटले.

   उन्हाळ्यात त्या जमीन उकरून तेथे अन्न साठवून ठेवतात आणि हिवाळ्यात हेच अन्न काढून खातात. यापैकी न खाल्लेल्या काही बिया व दाणे जमिनीत तशाच राहतात. खारींच्या या सवयीमुळे वनसंवर्धनास मदत होते.

































Saturday, April 14, 2012

भटकणारी माकडे










कालच मिडियामघ्ये 'माकडाचे पिल्लु पाणी पिताना पेल्यात त्याचे
डोके अडकून मेले', ही बातमी दिली जात होती.वाईट वाटले.
अन्नाबरोबर पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने माकडांचे हाल चालू आहेत.
पाण्यासाठी माकडांची भटकंती चालू आहे.माकडांचे वास्तव्य असलेल्या दरीत
पाण्याचा थेंबही नसल्याने अन्न व पाण्याच्या शोधार्थ माकडांना दूरवर भटकावे
लागत आहे.
आजही माकडे माकडच का आहेत?माणुस जर माकडापासुन उत्क्रांत
झाला असेल तर आजही माकडे माकडच का राहिली आहेत?




















































































































Friday, January 27, 2012

हेमलकसातले प्राण्य़ांचे अनाथालय









दिवंगत बाबा आमटेंनी सुरू केलेला आणि डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्या प्रयत्नांनी बहरलेला हेमलकसा इथल्या लोकबिरादरी प्रकल्पांत वन्यप्राण्यांसाठी येथे अनाथालय आहे.सात-आठ जातींचे कुत्रे, बिबटे, रानडुकरं, कोल्हे, अस्वल, हरणं, माकड, मगरी, नाग, पटेरी मण्यार, घोणस, अजगर, साळिंदर, घुबडं, शॅमेलिऑन असे विविध प्राणी येथे आहेत.आदिवासींच्या सेवेसाठी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.बाबांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदा यांनी साडेतीन दशके अथक परिश्रम करून प्रकल्पाला आजचे रूप दिले.दारिद्र्य, अज्ञान यांमुळे त्या भागात वन्यप्राण्यांची भरपूर शिकार होत असे. प्रकल्पावरच्या दवाखान्यात येणारे आदिवासी प्राणी मारल्यावर त्यांची पिल्लं प्रकाश आमटे याना आणून देत. या अनाथ पिल्लांचा संभाळ प्रकाश व  विलास यांनी केला. बिबट्या, सिंह, मगरी, साप, हरणं, घुबड, सर्पगरुड, माकडं, अस्वलं, सायाळ, नीलगायी असे असंख्य प्राणी प्रकल्पावरचे रहिवासी झाले आहेत. माडिया आदिवासींच्या भाषेत बिबट्या म्हणजे 'नेगल'. १९८३ साली एक माडिया आदिवासी प्रकल्पावर बिबट्याची दोन पिल्लं घेऊन आला. एक नर आणि एक मादी. मादी गेली, नर जगला. तोच हा नेगल.'नेगल'चा पहिला भाग १९९१ साली पुस्तक रुपात प्रकाशित झाला.


















































































































































Tuesday, May 31, 2011

प्राणी

प्राण्य़ांवर प्रेम करावे.प्राणी नेहेमीच मानवाला मदत करीत करतात. काही प्राण्याना मानव आपल्या कामासाठी पालत आहे.तर काही प्राण्यांची शिकार करीत आहे.निसर्गाला प्राण्याची गरज आहे. काही प्राण्याची शिकार होत असल्याने त्यांची संख्या कमी होत असल्याने त्यांच्या सुरक्षेततेसाठी सरकार वेगवेगळ्या योजना  आखत आहे.प्राणांच्या शिकारीवर बंदी आणावी.