Friday, January 27, 2012

हेमलकसातले प्राण्य़ांचे अनाथालय









दिवंगत बाबा आमटेंनी सुरू केलेला आणि डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्या प्रयत्नांनी बहरलेला हेमलकसा इथल्या लोकबिरादरी प्रकल्पांत वन्यप्राण्यांसाठी येथे अनाथालय आहे.सात-आठ जातींचे कुत्रे, बिबटे, रानडुकरं, कोल्हे, अस्वल, हरणं, माकड, मगरी, नाग, पटेरी मण्यार, घोणस, अजगर, साळिंदर, घुबडं, शॅमेलिऑन असे विविध प्राणी येथे आहेत.आदिवासींच्या सेवेसाठी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.बाबांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदा यांनी साडेतीन दशके अथक परिश्रम करून प्रकल्पाला आजचे रूप दिले.दारिद्र्य, अज्ञान यांमुळे त्या भागात वन्यप्राण्यांची भरपूर शिकार होत असे. प्रकल्पावरच्या दवाखान्यात येणारे आदिवासी प्राणी मारल्यावर त्यांची पिल्लं प्रकाश आमटे याना आणून देत. या अनाथ पिल्लांचा संभाळ प्रकाश व  विलास यांनी केला. बिबट्या, सिंह, मगरी, साप, हरणं, घुबड, सर्पगरुड, माकडं, अस्वलं, सायाळ, नीलगायी असे असंख्य प्राणी प्रकल्पावरचे रहिवासी झाले आहेत. माडिया आदिवासींच्या भाषेत बिबट्या म्हणजे 'नेगल'. १९८३ साली एक माडिया आदिवासी प्रकल्पावर बिबट्याची दोन पिल्लं घेऊन आला. एक नर आणि एक मादी. मादी गेली, नर जगला. तोच हा नेगल.'नेगल'चा पहिला भाग १९९१ साली पुस्तक रुपात प्रकाशित झाला.


















































































































































No comments: