Showing posts with label शोभायात्रा. Show all posts
Showing posts with label शोभायात्रा. Show all posts

Tuesday, April 1, 2014

'गुढीपाडवा' सण नववर्षाचा....शोभायात्रा- ठाणे



 'गुढीपाडवा' सण नववर्षाचा....शोभायात्रा- ठाणे       


नवीन वर्षाचे स्वागत करताना सामाजिक संदेश देण्याची भूमिकाही काही स्वागतयात्रा पार पाडतात.

कुठे ढोल-ताशांचे पथक, कुठे भगव्या पताका नाचवणारी तरुणाई, कुठे आकर्षक चित्ररथ तर कुठे पारंपरिक वेशभूषेत पहाटेपासूनच रस्त्यावर उतरलेला जनसागर.


पारंपरिक वस्त्रे घातलेली तरुणाई या शोभायात्रांत मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. 






                                                                     कोपीनेश्वारांची पालखी. 
















































































































































                                                                                                                            नुतन वर्षाभिनंदन

Thursday, April 11, 2013

शोभायात्रा- ठाणे (२०१३)



                            !! गुडीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेछ्या !!


    हे येणारे नविन वर्षे तुम्हा सर्वांना सुखाचे,
       समृद्धीचे व भरभराटीचे जावो हिच देवाचरणी प्रार्थना!


               गुढीपाडवा म्हणजेच ’चैत्र शुध्द प्रतिपदा’ ज्या दिवशी महाराष्ट्राचा सातवाहन
                    राजा गौतमीपुत्र ’सातकर्णी’ ने क्षत्रप राजा ’नहपान’ याचे हनन (वध) केले होते.
                       हा दिवस खुप मोठ्या विजयाचा होता. तेंव्हापासून ह्या विजयाच्या साक्षीने महाराष्ट्रीय
                          मराठी कालगणना सुरु केली गेली आणि हा दिवस गुढीपाडवा म्हणुन साजरा करण्यास
                             सुरुवात झाली. या दिवसाचे स्वागत महाराष्ट्रभर गुढ्या उभारुन केले जाते.















































































































































Thursday, April 19, 2012

'ग्लोबल कोकण महोत्सव'

गेल्या वर्षी मुंबईत पहिला 'ग्लोबल कोकण महोत्सव' झाला आणि एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. यंदाही १२ ते १६ एप्रिल या काळात मुंबईत दुसरा कोकण महोत्सव झाला.

कोकण म्हणजे डॉलरभूमी. कोकणातील कृषी उत्पादने, काजू, मसाल्याची पिके, हापूस देशाला डॉलर देतात. मत्स्यसंपत्ती मोठ्या प्रमाणावर होते. सह्यादीतील दुमीर्ळ व वनौषधी व पर्यटन उद्योग यातून भविष्यात भरघोस डॉलर मिळतील. विकासाची सर्वाधिक क्षमता असलेला हा प्रदेश आज दुदैर्वाने मागासलेला आहे. फलोद्यान, हापूस आंबा, सागरी संपत्ती, पर्यटन उद्योग, कृषी पर्यटन, बंदरे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बुद्धिमान मनुष्यबळ यांचे व्यवस्थित नियोजन केले तर देशातील सर्वांत प्रगत प्रदेश म्हणून कोकणची ओळख होऊ शकेल. याचसाठी कोकण भूमी प्रतिष्ठान काम करीत आहे. पुढील १०-१५ वर्षांत काय करायचे, या भूमिकेतून कोकण व्हिजन २०२० हा अजेंडा प्रतिष्ठानने निश्चित केला.

निसर्गसमृद्धी, पर्यटनस्थळे, लोककला, संस्कृती, उद्योग आणि उद्योजक यांना जागतिक व्यासपीठ मिळावे म्हणून गेल्या वषीर्पासून ग्लोबल कोकण महोत्सव आम्ही सुरू केला. गेल्या १५ वर्षांत केरळने निसर्गसौंदर्याची प्रसिद्धी जगभर केली आणि आज तो जागतिक पर्यटनाचा केंदबिंदू झाला. हजारो कोटींची अर्थव्यवस्था उभी राहिली. हे कोकणात शक्य आहे; असा विचार करून हा महोत्सव सुरू केला. बांदा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये चार लाख स्क्वेअर फूट जागेवर पहिल्यांदाच हा आंतरराष्ट्रीय महोत्सव झाला आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. चार लाखांहून अधिक उत्सुक नागरिक महोत्सवात सहभागी झाले होते.
























































































Friday, March 23, 2012

स्वागतयात्रा - २०१२ (ठाणे)



                        नववर्षाच्या शुभेच्छा  









     गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वागतयात्रांचं आयोजन होत 
असतं  किंवा   लहानमोठे   सांस्कृतिक   कार्यक्रम होत असतात. गुढीच्या 
उत्सवी   परंपरेसोबतच     स्वागत  यात्रा,   सांजपाडवा  आणि   यात्रोत्सव 
अशा विविध कार्यक्रमांनी नववर्षाचे स्वागत झाले आहेत. गुढीपाडव्याच्या 
दिवशी  गिरगाव, दादर, बोरिवली ,ठाणे,डोंबिवली  या भागात स्वागतयात्रा 
निघत  असतात.नववर्ष स्वागत यात्रेचं जनक असलेल्या डोंबिवली येथील 
गणेश मंदिर संस्थान आहे.या संकल्पनेचं लोण राज्यात सर्वत्र पसरलं आहे.