Thursday, April 19, 2012

'ग्लोबल कोकण महोत्सव'

गेल्या वर्षी मुंबईत पहिला 'ग्लोबल कोकण महोत्सव' झाला आणि एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. यंदाही १२ ते १६ एप्रिल या काळात मुंबईत दुसरा कोकण महोत्सव झाला.

कोकण म्हणजे डॉलरभूमी. कोकणातील कृषी उत्पादने, काजू, मसाल्याची पिके, हापूस देशाला डॉलर देतात. मत्स्यसंपत्ती मोठ्या प्रमाणावर होते. सह्यादीतील दुमीर्ळ व वनौषधी व पर्यटन उद्योग यातून भविष्यात भरघोस डॉलर मिळतील. विकासाची सर्वाधिक क्षमता असलेला हा प्रदेश आज दुदैर्वाने मागासलेला आहे. फलोद्यान, हापूस आंबा, सागरी संपत्ती, पर्यटन उद्योग, कृषी पर्यटन, बंदरे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बुद्धिमान मनुष्यबळ यांचे व्यवस्थित नियोजन केले तर देशातील सर्वांत प्रगत प्रदेश म्हणून कोकणची ओळख होऊ शकेल. याचसाठी कोकण भूमी प्रतिष्ठान काम करीत आहे. पुढील १०-१५ वर्षांत काय करायचे, या भूमिकेतून कोकण व्हिजन २०२० हा अजेंडा प्रतिष्ठानने निश्चित केला.

निसर्गसमृद्धी, पर्यटनस्थळे, लोककला, संस्कृती, उद्योग आणि उद्योजक यांना जागतिक व्यासपीठ मिळावे म्हणून गेल्या वषीर्पासून ग्लोबल कोकण महोत्सव आम्ही सुरू केला. गेल्या १५ वर्षांत केरळने निसर्गसौंदर्याची प्रसिद्धी जगभर केली आणि आज तो जागतिक पर्यटनाचा केंदबिंदू झाला. हजारो कोटींची अर्थव्यवस्था उभी राहिली. हे कोकणात शक्य आहे; असा विचार करून हा महोत्सव सुरू केला. बांदा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये चार लाख स्क्वेअर फूट जागेवर पहिल्यांदाच हा आंतरराष्ट्रीय महोत्सव झाला आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. चार लाखांहून अधिक उत्सुक नागरिक महोत्सवात सहभागी झाले होते.
























































































No comments: