चंदपूर-गडचिरोलीमागेर् हरणघाटपासून ७० किमीवर वैनगंगा नदीच्या काठावर 'मार्कंडा' हे भगवान शंकराचं विशाल मंदिर आहे. कलाकुसरीवरून इतिहासकारांनी त्याला 'विदर्भाचं खजुराहो' म्हटलं आहे. मंदिराच्या अनमोल कलाकृतीच्या अप्रतिम सुंदरतेसमोर निमिर्तीसंदर्भाचे इतिहासकारांतील मतभेद गळून पडतात. भटाळा येथील भव्य मंदिरावर कसलेही गुंबद आणि कलश नसून छत सपाट आहे. त्यास स्थानिक लोक 'भांवेडा मंदिर' म्हणतात.'वैनगंगा' खाली वाहणारी नदी यामुळे मार्कंडा अतिशय सुंदर पर्यटन स्थळ बनलं आहे.मार्कंडाच्या मंदिरावरील शिल्प, बघणाऱ्यांना खजुराहो किंवा कोणार्क पाहिल्याचा आनंद देतं. 'मार्कंडा' विदर्भाचं सांस्कृतिक शिल्पवैभव आहे, यात शंकाच नाही. मार्कंडा या लहानशा खेड्यातील १८ लहान-मोठ्या मंदिरांचं हे संकुल इतिहासकार आणि शिल्पकलेच्या अभ्यासकांसाठी कुतुहलाचा विषय झाला आहे. दुदैर्वाने कला-संस्कृतीचा हा मूतीर्मंत आविष्कार महाराष्ट्र सरकारकडून मात्र आजवर दुर्लक्षित आहे.
Wednesday, January 4, 2012
मार्कंडा

Labels:
महादेव मंदीर
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment