Wednesday, February 29, 2012

गीताई मंदिर









वर्धा येथील गीताई मंदिराचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे याला कळस नाही आणि मंदिराच्या भिंतींवर गीताईतील ओळी कोरल्या आहेत. मोकळ्या आकाशाखाली विस्तीर्ण जागेवरील गीताई मंदिर दर्शनी भागाकडून 'चरखा' तर मागच्या बाजूने 'गायीच्या' आकाराचे दिसते.

18 अध्यायांसाठी 18 प्रकारच्या शिळा देशाच्या चारी दिशांकडून आणले असून त्यावर देवनागरीत 'गीताई' कोरण्यात आले आहे. गेल्या 25 वर्षांत ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करूनही दगड व अक्षरांची चमक आजही कायम आहे. प्रत्येक शिळेवर जमिनीपासून पाच ते सहा फूट वर एक एक श्लोक कोरला असून शिळेची उंची आठ ते 10 फूट आहे.

भारतातील चारही दिशांतून आणलेल्या 730 शिलांवर विनोबाजींची "गीताई' कोरून त्या शिलांची मांडणी "चरखा
आणि गायी'च्या प्रतिकात्मक आकारात करण्यात आली. हेच ते 'गीताई मंदिर'. ही गोपूरी स्थित वास्तू भारतात एकमेव आहे.












































































1 comment:

Mr.Guest said...
This comment has been removed by the author.