Monday, April 9, 2012

र त न ग ड

मावळ्यांसह मागच्या महिन्यात 'रतनगड'चा ट्रेक केला.सुंदर परीसर,आव्हान देणारा गड,गडावर पाहाण्यासारखी खुप ठिकाणे.मुंबईहून इगतपुरी-घोटी मार्गे भंडारदरा धरणाला वळसा घालून रतनवाडीला पोहचता येते.गणेश दरवाजा,रत्ना देवीची गुहा,प्रमुख दरवाजा,इमारतींचे जोते.,कडेलोट पॉइंट,राणीचा हुडा, प्रवरेचे उगमस्था,अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले,नेढ़,कल्याण दरवाजा.

रतनवाडी ला शंकराचे छान अमृतेश्वर मंदिर आहे. पांडवानी एका रात्रीत हे मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या आतून व बाहेरून कोरीव काम केलेले आहे.देवदर्शन करून लगेच गडाकडे कूच केले.

नदीकीनारून चालत पुढे गेल्यावर खरी चढण सुरु होते.घनदाट जंगल, आणि माथ्यावर गड "हर हर महादेव!"
चा जल्लोष  करून आम्ही चढायला सुरुवात केली.थोडा जंगलातून बाहेर आल्यासारख वाटल. डुगडुगणारी शिडी, ९० अंशामध्ये हलणारा कठडा, अरुंद पायऱ्या कशाची परवा न करता आम्ही वर चढलो. तिथे वर देवीच दर्शन घेतलं.समोरच्या डोंगराकडे फक्त बघत राहिलो.त्या 'कात्राबाई कड्याच' शब्दात वर्णन कारण अशक्य आहे.कातळकोरीव पायर्‍यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबक दरवाजा आहे.

कुलंग, मदन, अलंगडाबरोबर महाराष्ट्राचे उत्तुंग शिखर कळसूबाईचे दर्शन घेवून आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो. नेठे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेढे आहे. नेढय़ामधून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो. .

गडाच्या पश्चिमकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात. त्याच्या उजवीकडे आजोबाचा
विशाल पर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. याला राणीचा
हुडा म्हणतात.इथून जवळच गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे. जवळच कडय़ात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवी तांदळा आहे. 

गणेश दरवाजातून शिडीच्या वाटेने खाली उतरावे लागते. या शिडय़ा अतिशय अवघड जागी बसवलेल्या आहेत.
अतिशय धाडसाने व सावधानतेनेच हे दिव्य पार करावे लागते. कमकुवत मनाच्या लोकांना हे अवघड ठरु शकते. शिडय़ाउतरुन खालच्या पायवाटेने जंगलातून आपण दीड ते दोन तासामधे रतनवाडी मघ्ये पोहोचता येते.

































































































2 comments:

kaka said...

sirji i appreciate by urs photos .aapaka jababbbbbbbbbbbbbb nahi

VIVEK TAVATE said...

KAKA,आभारी आहोत.